https://nitinsalagare.blogspot.in या शैक्षणिक ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत!
.

Monday, 31 July 2017

Types of pranayam

In this post,I am going to explain about types of pranayam . There are eight types of pranayam .You can read more information about it.

प्राणायाम प्रकार

योगशास्त्रामध्ये प्राणायामाचे आठ प्रकार सांगितले आहेत:
१.सुर्यभेदन २.उज्जायी ३.सीत्कारी ४.शीतली ५.भस्त्रिका ६.भ्रामरी ७.मूर्च्छा आणि ८.प्लाविनी
खाली प्रत्येक प्रकारचा परिचय , कृती आणि त्यापासून होणारे फायदे पाहणार आहोत.

१.सूर्यभेदन प्राणायाम :-

पिंगळा नाडीचे दैवत सूर्य आहे.पिंगळा नाडी जागृत करणे,हा या प्राणायामाचा हेतू आहे या प्राणायामामुळे मस्तकाचा पुरुषशक्ती असणारा भाग जागृत होतो.सुर्यभेदानामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. म्हणून हा प्रकार थंडीमध्ये करावा

कृती 

१) पद्मासनात किंवा सिद्धासनात  बसा.
२)डोळे बंद करून,डावी नाकपुडी उजव्या हाताच्या करंगळीने बंद करा.

Yoga

३) उजव्या नाकपुडीने शक्य तितका श्वास घ्या.
४)नंतर उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा.हनुवटी जालंधरबंधातील कृतीप्रमाणे छातीला चिकटवा.
५) मग कुंभक करा.
६) त्यानंतर डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडा.

फायदे:-

१)मनःशांती लाभते
२) आतड्यातील रोगजंतू आणि आतडयातील रोग नाहिसे होतात.
३)यकृत सशक्त बनून योग्य प्रमाणात पित्तरस तयार होतो.
४)पिंगळा नाडी कार्यक्षम बनते.
५)डोळ्याचे विकार नाहीसे होतात .
६) सर्दी-पडशामुळे हैराण झालेलयांसाठी हा प्रकार उपकारक आहे.
७) कुंडलिनी जागृत होते व त्यामुळे  जठराग्नी प्रदीप्त होतो.

२) उज्जायी प्राणायाम:-

उज्जयी ह शब्द उद+ जय यापासून बनला आहे.उद म्हणजे जोराने जय म्हणणे  यावरून मोठ्याने जयजयकार करणे असा अर्थ होतो.
उज्जयी करताना कंठातून मोठ्याने शिट्टीसारखा आवाज येतो . तोच जयजयकार समजून या प्राणायामास उज्जयी असे नाव दिले आहे.

कृती 

१) पद्मासन किंवा सिद्धासन घालून बसा.
२)तोंड बंद करून हनुवटी गळपट्टीच्या हाडांमध्ये बसवा.
३) डोळे मिटून दोन्ही नाकपुड्यातून सावकाश दीर्घ श्वास घ्या .श्वास घेतेवेळी सस असा आवाज आला पाहिजे .फुफ्फुसे भरेपर्यंत श्वास घ्या.
४)आता जीभ उलटी करून जिभेचा शेंडा टाळूच्या आतल्या बाजूस लावून(जिव्हा बंध) श्वास शक्य होईल तितका वेळ रोखून धरा .
५) आता डोके वर करा . जिव्हा बंध सोडा व संथपणे श्वास बाहेर सोडा.

फायदे:-

१) या प्राणयामामुळे डोक्यातील उष्णता कमी होते. तसेच दमा क्षय आणि फुफ्फुसाचे रोग बरे होतात.
२) पचन संस्था ,श्वसन संस्था आणि मज्जासंस्था कार्यक्षम बनतात 
३) मन व शरीर ताजेतवाने होते.
४) शरीराला पुरेशा प्रमाणात प्राणवायु मिळाल्याने हृदयासंबंधीच्या तक्रारी नाहीशा होतात.
५) उज्जायी करताना कफ,अपचन ,ज्वर आदी व्याधी होत नाहीत.

घ्यायची नोंद:-या प्राणायामाच्या सरावाने शरीरात उष्णता निर्माण होते ;म्हणून हा प्रकार हिवाळ्यात करावा.


३) सीत्कारी प्राणायाम:-

शरीरात थंडावा निर्माण करणारा असल्याने या प्रणायामास  सीत्कारी किंवा शीतकारी  म्हणतात.याचा सराव उन्हाळ्यात केल्यास फायदा होतो.

कृती :-

१) पद्मासन किंवा सिद्धासन घालून बसा.
२) दात एकमेकावर दाबून ठेवा.
३) आता जीभ दाताना लावा आणि जिभेचे टोक टाळूस लावा 
४) सी.. सी.. असा आवाज करत तोंडाने श्वास घ्या.श्वास घेऊन झाल्यावर तोंड बंद करा आणि शक्य तितका वेळ कुंभक करा.
५)त्यानंतर दोन्ही नाकपुड्याने रेचक करा( श्वास बाहेर सोडा.)

फायदे:-

१) सीत्कारी प्राणायामाच्या सरावाने भूक व तहान नियंत्रित होते.तसेच आळस दूर होतो. झोपेवर नियंत्रण राहते.
२)  डोळे व कान याना शीतलता प्राप्त होते .
३) दाताचे पायोरियासारखे रोग,गळा आणि जिभेचे रोग बरे होण्यास मदत होते.
४)नियमित सरावाने सौन्दर्य वाढते आणि शरीर बलवान बनते .


४) शीतली प्राणायाम:-

शीतली प्रणायामामुळे शरीरात थंडावा निर्माण होतो; म्हणून या प्राणायामास शीतली प्राणायाम म्हणतात

  कृती:-

१) पद्मासनात ,सिद्धासनात किंवा वज्रसनात बसा
२) तोंड उघडून जीभ बाहेर काढा 
३)  पक्षाच्या चोचीप्रमाणे जिभेची नळी करून सी..सी..
असा आवाज करत तोंडाने श्वास घ्या(पूरक करा)
४) पूरक पूर्ण होताच तोंड बंद करा . थोडा  श्वास रोखून धरा.
५) दोन्ही नाकपूड्याद्वारा संथपणे श्वास बाहेर सोडा.

फायदे :-

१) या प्राणयामामुळे रक्तातील विषारी घटक बाहेर फेकले जातात.
२) नियमित सरावाने प्लीहा,त्वचारोग,ताप ,अजीर्ण होणे व बद्धकोष्ठ यासारख्या व्याधी नाहीशा होतात.
३)नियमित सराव करणाऱ्या साधकाला सापाच्या आणि विंचवाच्या विषाची बाधा होत नाही.
४)तामसी व रागीट लोकांसाठी हा प्राणायाम खूप लाभदायी आहे.
५)जीभ आणि तोंडाचे विकार नाहीसे करण्यासाठी हा प्रकार उपयोगी ठरतो.
६) खूप तहान लागली असेल ,पण प्यायला पाणी मिळत नसेल ;तर शीतली प्राणायाम करावा म्हणजे त्वरित तहान भागते.

________________________;_______________

No comments:

Post a Comment

leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.

Spoken English Training March 2018

We have completed training which is Spoken English training in Kalabani, Khed Ratnagiri.Our trainer are Mr.Prabhakar Kolekar &   In th...