https://nitinsalagare.blogspot.in या शैक्षणिक ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत!
.

भगिनी निवेदिता

भगिनी निवेदिता

भगिनी निवेदिता यांच्या जन्म २८ ऑक्टोबर १८६७ आयर्लंड मधील डंगरनोन टायरान या ठिकाणी झाला .

भगिनी निवेदिता एक ब्रिटीश आयरिश सामाजिक कार्यकर्त्या ,लेखिका ,शिक्षिका आणि स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या होत्या .त्यांचे मुळ नाव मार्गारेट एलिझाबेथ नोबेल असे असून ,त्यांचे बालपण गावी आयर्लंड या ठिकाणी झाले त्यांच्या वडिलांचे नाव सैमुएल रिचमंड आणि आईचे नाव मेरी इसाबेल .त्यांनी त्यांच्या वडिलांकडून आणि शिक्षकाकडून मानवाची सेवा हीच खरी ईश्वराची सेवा आहे अशी शिकवण घेतली. समाजाची सेवा आणि प्रेम याबद्दल एवढी दृढ भावना निर्माण झाली कि त्या निस्वार्थी पणामुळे समाजाची सेवा करू लागल्या  सेवा आणि त्याग या वृत्तीमुळे त्यांना भारतात खूप मान मिळत गेला .

    भगिनी निवेदिता यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्या त्याचप्रमाणे महिलांच्या शिक्षणासाठीही प्रयत्न केल्या .

    
    सन नोवेंबर १८९५ मध्ये भगिनी निवेदिता जेंव्हा मैत्रिणीच्या घरी गेल्या तेंव्हा  स्वामी विवेकानंद  उपस्थित लोकांना  वेदांत दर्शन या विषयावर मार्गदर्शन करत होते .त्यांच्या या विचारावर ,वक्तृत्वावर प्रभावित झाल्या आणि त्यानंतर त्या अनेक ठिकाणी त्यांच्या व्याख्यानासाठी गेल्या आणि विविध प्रश्नांचे उत्तरांच्या माध्यमातून  समाधान स्वामी विवेकानंद यांनी केल्याने त्या खूप प्रभावित झाल्या आणि त्यांच्या मनात स्वामी विवेकानंदाविषयी मनात प्रेम आणि आदराची भावना उत्पन्न झाली आणि  त्याच क्षणी त्या स्वामींजीच्या शिष्या झाल्या .त्यानंतर त्या १८९८ मध्ये कोलकाता( भारत)  या ठिकाणी आल्या .स्वामी विवेकानंदाच्या विचाराशी प्रभावित होऊन  रामकृष्ण परमहंस यांच्या त्या महान शिष्या झाल्या आणि भारतालाच आपली कर्मभूमी मानून समाजाची सेवा करण्याकरिता आपले उभे आयुष्य खर्ची घातले.. 

No comments:

Post a Comment

leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.

Spoken English Training March 2018

We have completed training which is Spoken English training in Kalabani, Khed Ratnagiri.Our trainer are Mr.Prabhakar Kolekar &   In th...