This type of yoga is like a padamaasan which is helpful for loose weight and flat belly.Here more information about it in Marathi
उत्थित पद्मासन ( लोलासन)
हे आसन पद्मासनाचाच प्रकार आहे .या आसनामध्ये हाताचे पंजे शरीरालगत जमिनीवर टेकवून हातावर जोर देऊन शरीर वरच्या दिशेने उचलावे लागते. म्हणून या आसनास उत्थित पद्मासन किंवा लोलासन किंवा झूलासन असे म्हणतात.
या आसणामध्ये शरिराचा भार दोन्ही हातावर सम प्रमाणात उचलावयाचा असतो.त्यामुळे हे आसन थोडेसे अवघड आहे.
या आसनांची कृती
१) प्रथम पद्मासनात बसावे
२)दोन्ही हाताचे पंजे शरीरालागत दोन्ही बाजूंना जमिनीवर टेकवावे.
३)हळुहळू शरीर वर उचलावे, शरीराला हिसके देऊ नये.
४)शरीर जितका वेळ अधांतरी ठेवता येईल,तितका वेळ श्वास रोखून धरावा
५)शरीर पूर्ण स्थितीत आणताना श्वास सोडावा.
या आसनामुळे होणारे फायदे:-
१)या आसनामुळे हाताचे सांधे व स्नायू सुदृढ बनतात .
२)पोटातील आतडी सशक्त बनतात
३)या आसनाच्या नियमित सरावाने जठराग्नी प्रदीप्त होतो.
४) मन प्रसन्न राहते आणि शरीर सुदृढ बनते.
५) या आसनामुळे बद्धकोष्ठता,अजीर्ण ,अति झोप यासारख्या विकृती दूर होतात.
_________________________________________
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.