Bond in yoga : Mulbandh, Jalindharbandh and Uddiyanbandh.
Here I am going to explain about Bond in marathi and also importance of bond
बंध
बंध या शब्दाचा अर्थ बंधन घालणे असा आहे.याद्वारे अंतर्गत अवयवाना मसाज मिळतो आणि तेथील रक्तप्रवाह सुधारतो.
प्रणायामादरम्यान मुख्यत्वे या तिन बंधांचा उपयोग केला जातो.हे तिन्ही बंध प्राणायामच्या क्रियेत अत्यंत उपयोगी मानण्यात येतात. बंध ही अंतर्गत शारीरिक प्रक्रीया आहे.बंधांचा सराव केल्याने माणूस शरीराचे विविध अवयव व नाडीव्यवस्था यावर नियंत्रण ठेवण्यास समर्थ बनतो.
प्राणायामाच्या सरावात उपयुक्त असणाऱ्या तिन्ही बंधांची कृती व फायदे यांची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
१) मूलबंध
कृती :
१ ) प्रथम उजव्या पायाची टाच जननेंद्रियावर दाबून ठेवा.नंतर डाव्या पायाची टाच जननेंद्रियाच्या मुळाशी ठेवा.
२) गुदद्वाराचा संकोच करून ,जोर लावून पाठीच्या कण्याकडे आकर्षून अपानवायू पाठीकडे चढवा.
३)मूलबंध लावतांना शरीर शिथिल ठेवा.
फायदे:-
१)या बंधाने प्राणायाम नीट करता येतो.
२)या बंधांचा सराव ब्रम्हचर्यपालनासाठी उपयुक्त असतो.
३)या बंध्याच्या नियमित सरावाने जठराग्नी प्रदीप्त होतो आणि बद्धकोष्ठता दूर होते.
४)कुंडीलिनी जागृत होते.
५) साधकाला तारुण्याचा जोम व उत्साह प्राप्त होतो.
६)कंबरदुखी नाहीशी होण्यास मदत होते.
जालंधरबांध
कृती
१) प्रथम पद्मासनात बसा
२) नंतर कंठ संकोचून घ्या आणि डोके खाली वाकवा.
३) हनुवटी व्यवस्थित दाब देऊन कंठाखालच्या खळगीत बसवा.
४) हा बंध लावताना शरीर शिथिल ठेवा.
फायदे
१) या बंधाच्या सरावाने थायरॉईड ग्रंथींना भरपूर रक्तपुरवठा होतो.
२)आवाज मधुर,सुरेल आणि कानांना गोड वाटतो.
३)गळ्याचे विकार नाहीसे होतात.
४)थायरॉईड ,टॉन्सिल अशा व्याधीमध्ये या बंधांची क्रिया लाभदायक ठरते.
हा बंध करताना घ्यायची काळजी किंवा नोंद:--
पूरक केल्यावर कुंभक करताना हा बंध करतात आणि रेचक झाल्यानंतर बाह्य कुंभक केला जातो.
३) उडडियानबंध
कृती
१) हा बंध उभा राहून किंवा बसून देखील करता येतो.
२)दोन्ही हात गुडघ्यावर किंवा कंबरेवर ठेवा आणि शरीर थोडे पुढे वाकवा.
३)दोन्ही पायात थोडे अंतर घ्या.श्वास जोराने बाहेर काढून फुफ्फुसे रिकामे करा.
४)पोट बरगड्यापासून आत खेचून, नाभी व आतडे वर खेचा.यामुळे उदर वर येईल.
५) मोठ्या आतड्याचा भाग वर उचलला जाईल
६) हा बंध कुंभक झाल्यानंतर करावा.
फायदे
१) हा बंध नियमीतपणे केल्यास चिरयौवन प्राप्त होते
२)एकाग्रता मिळवण्यासाठी हा बंध उपयोगी ठरतो.
३) ब्रम्हचर्यपालनासाठी हा बंध उपयुक्त ठरतो.
४)नियमित सरावाने शक्ती वाढते आणि शरीर निरोगी राहते.
५)पोटाचे विकार नाहिसे होतात.
६)पोटातील कृमी नाहिशा होतात.
७)पोटातील आंतरेन्द्रिये उदा.यकृत,स्वादुपिंड,लहान आतडे ,मोठे आतडे आणि मूत्रपिंड याना या बंधामुळे मसाज मिळतो.
८) बद्धकोष्ठता दूर होते.

No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.