https://nitinsalagare.blogspot.in या शैक्षणिक ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत!
.

Wednesday, 26 July 2017

purak , kumbhak and rechak

The parts of Pranayam are purak , kumbhak and rechak.Here more information about it in Marathi.


प्राणायाम

प्राणायाम या शब्दाचा अर्थ 'प्राणाचे नियंत्रण' हा आहे. महर्षी पतंजलीने यांनी जी योगसुत्रे तयार केली आहेत,त्यामध्ये साधनपाद प्रकरणात सविस्तर माहिती दिली आहे.
आपण आपल्या श्वासोच्छ्वास गतीमध्ये  जो फरक करतो आणि श्वास रोखून धरतो,त्याला प्राणायाम म्हणतात.

प्राणायाम करण्यासाठी साधकाने पद्मासन , सिद्धासन , स्वस्तिकासन किंवा सहजासन स्थितीत बसावे.
पूरक , कुंभक आणि रेचक करण्यासाठी प्रणवमुद्रेचा
वापर करावा.
Pranavmudra
Pranavmudra

 आपण प्राणायाम करण्यासाठी,प्राणायाम करणाऱ्या साधकाने काही शब्दाच्या संकल्पना समजून घ्यायला पाहिजेत त्या खालील प्रमाणे आहेत.

१)पूरक:-

पूरक हे एक महत्वाचे अंग आहे.यामध्ये श्वास आत घ्यायचा असतो;पण केवळ श्वास आत घेतल्यानेच पूरक पूर्ण होत नाही. विशिष्ट पद्धतीने श्वास घेतला तरच ही क्रिया पूर्ण होते.
चांगल्या प्रकारे पूरक करण्यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.

१) फुफ्फुसात जमलेली सर्व  हवा  बाहेर काढल्यानंतरच पूरक क्रियेस सुरुवात करावी.
२)श्वास हळूहळू घ्यावा.
३) सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूरक क्रियेची गती हीच ठेवावी .याचाच अर्थ असा की,पूरक सुरू करताना सुरुवातीच्या सेकंदादरम्यान जितकी हवा आत घेतली जाईल,तितकीच हवा शेवटच्या सेकंदाच्या दरम्यान घ्यायला हवी.
४)सामान्यतः श्वास घेताना पोट आपोआप बाहेर येते.पोट बाहेर आल्यास त्यावर नियंत्रण ठेवायचे असते.जर पोट बाहेर येण्यावर नियंत्रण प्राप्त केल्यास छाती अधिक बाहेर येईल.परिणामतः फुफ्फुसात अधिक हवा जाऊ शकेल.
५)पुरकच्या शेवटच्या भागात झटका देऊन दीर्घ श्वास आत ओढण्याचा प्रयत्न करू नये.

कुंभक :-

कुंभकाचा अर्थ आहे श्वास रोखून धरणे.श्वास आत घेऊन रोखून धरण्याला आंतरिक कुंभक म्हणतात; तर श्वास सोडून रोखून धरण्याला बाह्य कुंभक म्हणतात.

Kimbhak

याच प्रकारे पूरक व रेचक यांनी युक्त असलेल्या क्रियेस सहित कुंभक म्हणतात.
   
रेचक

नाकपुडीतून विशिष्ठ गतीने ,अवधानपूर्वक श्वास बाहेर काढणे म्हणजे रेचक होय.
१) एक नाकपुडी बंद ठेऊन दुसऱ्या नाकपुडीने श्वास बाहेर काढावा.
२) रेचक करण्याची गती पूरक करण्याच्या गतीपेक्षा दुप्पट असायला हवी.
३)मन शांत ठेवा,श्वासवर लक्ष केंद्रित करा.
४) रेचकच्या गतीमुळे पोट व छाती हळूहळू आंकूचित होतात.पोट जितके आंकुचित  होईल, तितके चांगले आहे,पण अनावश्यक जोर लावू नका.
५) पोटाचे आंकुचन होईपर्यंत रेचक करावा.


पूरक,कुंभक व रेचकासाठी १:४:२ असे प्रमाण ठेवायला हवे.म्हणजेच
उदा.१ सेकंद कालावधी पूरकसाठी ,४सेकंद कालावधी कुंभकासाठी आणि २ सेकंद कालावधी रेचकासाठी.
पूरक , कुंभक आणि  रेचकासाठी कालावधी वरील प्रमाणात वाढवू शकतो.
पुष्कळ सरावानंतर हे प्रमाण सवयीने अंगवळणी पडते.
----------------------------------------------------------------------------––--











No comments:

Post a Comment

leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.

Spoken English Training March 2018

We have completed training which is Spoken English training in Kalabani, Khed Ratnagiri.Our trainer are Mr.Prabhakar Kolekar &   In th...