https://nitinsalagare.blogspot.in या शैक्षणिक ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत!
.

Tuesday, 27 June 2017

How to identify overweight or obese

Here I am trying to explain about overweight or obese and also explaining which problems created due to overweight.

लठ्ठपणा कसा ओळखाल?

सर्वप्रथम आपण पाहूया लठ्ठपणा कसा वाढतो?

व्यायामाचा अभाव, योगासनांचा अभाव,चुकीच्या खाण्याच्या सवयी,क्रीडांगणापासून दूर राहणे,सातत्याने टीव्ही समोर कार्टून अथवा गेम खेळण्यात मग्न असणे आणि हे करत असताना हातात काहीतरी खायला असणे, बैठे काम ,आनुवंशिक ,अधिक उष्मांकचा आहार, मानसिक तणाव, थायरॉइड , हार्मोन्सची कमतरता व त्यामुळे होणारे हार्मोन्सचे असंतुलन अशा कारणामुळे हल्ली लठ्ठपणा वाढताना दिसतो.

लठ्ठपणाचे लक्षणे:-

चालताना धाप लागणे,दम लागणे.
श्वासाची गती वाढणे,थकणे, वारंवार भूक लागणे,चिडचिड होणे,कंटाळा येणे ही लक्षणे दिसू लागतात
मुलामध्ये आलेला हा जाडेपणा आहे का लठ्ठपणा आहे हे ओळखता आले पाहिजे.मुले काय खातात,व्यायाम किती करतात,किती चालतात,धावतात याकडे लक्ष दिले पाहिजे ,नाही तर ही मूले मोठी झाली की त्यांच्यात आळशीपणा वाढीस लागतो आणि बघता बघता पोटाचा घेर सुटायला लागतो.
वाढलेल्या लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात.लठ्ठपणामुळे जेवढे वजन वाढते त्याचा बोजा शरीराच्या विविध अवयवावर पडून ते अवयव निकामी होऊ शकतात. मुलासह मोठ्यांमध्ये लठ्ठपणा वाढत जाते तसे शरीरात चरबीचे प्रमाण वाढत जाते.वाढलेली चरबी विविध आजारांना आमंत्रण देते.

लठ्ठपणा कसा मोजायचा?

आंतरराष्ट्रीय संकेतानुसार व्यक्तीचा बॉडी मास इंडेक्स (BMI) मोजणे आवश्यक असते.हे वजन व उंचीचे प्रमाण असते.व्यक्तीचे वजन त्याच्याच उंचीच्या प्रमाणात आहे किंवा नाही याची माहिती BMI वरून समजते.



बी एम आय =व्यक्तीचे वजन (कि ग्रॅ) /व्यक्तीची उंची ( मी)

स्त्रियांच्या कमरेचा घेर ८०सेमी पेक्षा अधिक असेल आणि पुरुषाच्या कमरेचा घेर ९० सेमी पेक्षा अधिक असल्यास लठ्ठपणा असतो,असे समजावे.

लठ्ठपणामुळे होणारे परिणाम:-
Diagram of obese


१)दैनंदिन व्यवहारात चालणे,उठणे यात अडचण निर्माण होते.
 २)लठ्ठपणामुळे उदासीनता निर्माण होते.
 ३)यकृतात पित्ताचे खडे होणे
 ४)लठ्ठपणामुळे शरीरातील सर्व भागावर ताण पडतो,त्यामुळे मधुमेह टाइप 2 हा आजार होण्याची शक्यता असते
 ४)पायांना सूज येणे,पायाच्या पोटऱ्या दुखणे,गुडघेदुखी आणि घोट्याचे आवरण झिजणे इ.दुखणी चालू होण्याची शक्यता असते.
५)घोरण्याचा आजार बळावणे.
६)हृदयविकाराचा धोका लहान वयात वाढणे,अतिरक्तदाब वाढणे आणि काही प्रकारचे कर्करोग वाढण्याची शक्यता असते.

मित्रांनो यावरून आपणास कळलच असेल , लठ्ठ व्हायचे की मजबूत.





No comments:

Post a Comment

leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.

Spoken English Training March 2018

We have completed training which is Spoken English training in Kalabani, Khed Ratnagiri.Our trainer are Mr.Prabhakar Kolekar &   In th...