https://nitinsalagare.blogspot.in या शैक्षणिक ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत!
.

Tuesday, 8 August 2017

Yog Mudra



योगमुद्रा

मुद्रा या शब्दाचे अर्थ बरेच आहेत.हठयोगात मुद्रा म्हणजे कुंडलिनी जागृती करताना सांगितलेल्या आसन सुदृश्य प्रक्रिया आहेत.हाताच्या विशिष्ट स्थिती अशा संदर्भातच मुद्रा हा शब्द वापरला आहे. खाली विविध मुद्राची माहिती नावसाहित दिली आहे .

१) षण्मुखी मुद्रा :--

चेहऱ्यावरील सहा मुखे बोटाच्या मदतीने बंद करण्याची प्रक्रिया असल्याने यास षण्मुखी मुद्रा म्हटले जाते.

Yoga

ब्रम्हमुद्रेप्रमाणे सहा दिशांना तोंड वाकवणे यात अपेक्षित नाही.

या मुद्रेची कृती :

ही मुद्रा पद्मासन, सिद्धासन ,स्वस्तिकासन किंवा वज्रासन अशा कोणत्याही आसनात बसून करता येते.
१) श्वास घेऊन ( पूरक करून ) ,डाव्या हाताचा अंगठा डाव्या कानामध्ये आणि उजव्या हाताचा अंगठा उजव्या कानामध्ये ठेवा.
२) डाव्या हाताची तर्जनी डावा डोळा बंद करून आणि उजव्या हाताची तर्जनी उजवा डोळा बंद करून पापणीवर ठेवा.
३) डाव्या हाताचे मधले बोट डाव्या नाकपुडीवर आणि उजव्या हाताचे मधले बोट उजव्या नाकपुडीवर दाबून ठेवा.
४) डाव्या हाताची अनामिका व करंगळी आणि उजव्या हाताची अनामिका व करंगळी  तोंड बंद करून ओठावर ठेवा.
५)श्वास रोखुन धरा ( कुंभक ) आतून हवेचा दाब  द्या.
 ६) दाब सहन होई पर्यंत कुंभक करा आणि नंतर श्वास सावकाश सोडून द्या ( रेचक करा) .

या मुद्रेमुळे होणारे फायदे  :-

१)आत निर्माण होणाऱ्या दाबामुळे अनेक चांगले परिणाम जाणवतात.
२) कान, डोळा घसा आणि  मेंदू  यांच्या कार्यावर अनुकूल परिणाम होऊन त्यांचे कार्य सुधारते.

घ्यायची दक्षता:-

चेहऱ्यावरचा एखादा दुबळा अवयव असेल, एखाद्या अवयवाची शस्त्रक्रिया झाली असेल तर तज्ञांच्या सल्ल्याने कृती करा.

२)ज्ञान मुद्रा

या मुद्राची कृती :-

१) पद्मासन ,सिद्धासन घालून बसा.
२) तळहात शिथिल करून हाताची मनगटे गुडघ्यावर ठेवा.
Yoga

३) हाताची तर्जनी आणि अंगठा पकडून ,त्यांचा आकार वर्तुळासारखा दिसेल आणि इतर बोटे किंचित वाकलेले असतील असे ठेवा.

३) द्रोणमुद्रा:-

१) पद्मासनात किंवा वज्रासनात बसा.
२)  हाताची स्थिती द्रोणाप्रमाणे खोलगट करून, खालच्या दिशेने करुन हात गुडघ्यावर ठेवा.
Yoga


३)डोळे बंद करा आणि ताठ बसा.

४) ब्रम्हमुद्रा :-

 ब्रम्हमुद्रा ही मानेच्या हालचालींसाठी ,व्यायामासाठी आहे.वरील तिन्ही प्रकार या हाताच्या संबधित होत्या,मात्र ही मुद्रा मानेच्या संबंधित आहे.
पुढे,मागे, डावीकडे आणि उजवीकडे अशा चार दिशांनी मानेची हालचाल करावी लागते.

Yoga

ब्राम्हदेवास चार तोंड असल्याने या मुद्रास ब्रम्हमुद्रा असे नाव पडले आहे.

या मुद्रेची कृती :-

१) स्वस्तिकासन किंवा वज्रासनात बसा.
२) प्रथम मान पुढे गळ्याचा खोबणीत ठेवा आणि पुढील बाजूस ताणा.
३) डोके सावकाश उचलून पूर्वस्थितीत या
४)आता मान मागील बाजूस वाकवून ,तोंड बंद करून ताण द्या
५) डोके सावकाश उचलून पूर्वस्थितीत या.
६) आता मान डाव्या बाजूला झुकवून खांद्याला स्पर्श करा ,मात्र खांदा वर उचलू नका.
७) डोके सावकाश उचलून पूर्वस्थितीत या.
८)मान उजव्या बाजूला झुकवून खांद्याला  स्पर्श करा ,मात्र खांदा उचलू नका.
९) डोके सावकाश उचलून पूर्वस्थितीत या.

घ्यायची दक्षता:-

ज्या व्यक्तिस मानेचा स्पाँडीलायटीस झाला असेल त्यांनी मान पुढे न ताणता मागील बाजूस ताणा. मात्र जास्त ताण देऊ नका.

५)पद्ममुद्रा:-

ज्ञानमुद्रा,द्रोणमुद्राऐवजी हाताची आणखी एक सोपी मुद्रा ती म्हणजे पद्ममुद्रा. यात हाताची बोटे एकमेकात गुंफवून ,डाव्या हाताचा पंजा नाभीखाली ठेवा आणि त्यावर उजव्या हाताचा पंजा ठेवा.
पद्मासनात  ही मुद्रा केल्यास दोन्ही पायांचे  तळवे व त्यावर दोन्ही हाताचे पंजे कमलाच्या पाकळ्याप्रमाणे  दिसतात.
धारणा ,ध्यान यांच्या अभ्यासाकरिता या मुद्रेची स्थिती उपयोगी पडते.


६) सिंहमुद्रा:-

ही मुद्रा चेहऱ्याच्या स्थितीच्या संबंधित आहे.

Yoga

या मुद्रेचा सिंहाशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी सिंह जेंव्हा भक्ष्यावर हल्ला करण्याकरता किंवा डरकाळी फोडण्याकरिता भयानक तोंड उघडते व जीभ लांब बाहेर काढतो त्यावेळी त्याचा चेहरा या मुद्रेत अपेक्षित आहे.

या मुद्रेची कृती: /

१)पद्मासन ,स्वस्तिकसन सिद्धासन यापैकी एका आसनात बसून हाताची द्रोणमुद्रा करा.
२)हाताने गुढघ्यावर किंचित दाब द्या.
३)मान सरळ करून तोंड जास्तीत जास्त उघडे करा.जीभ जास्तीत जास्त बाहेर काढून हनुवटीच्या दिशेने खाली गोलाकार वळवा.
४)भुवया वरच्या दिशेने ताणून घ्या.
या मुद्रेने चेहऱ्यावरील सर्व स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो .स्नायू थकले की ताण कमी करा.

या मुद्रेमुळे होणारे फायदे:-

१) चेहऱ्यावरील स्नायू ताणले गेल्याने त्यांचा रक्तप्रवाह सुधारतो.
२) अभिनय करणाऱ्यांना या मुद्रेचा चांगला फायदा होतो.
३) थायरॉईड टॉन्सिल्स सारखे विकार कमी मदत होते.
४)आवाजाची प्रत सुधारते आणि सौंदर्य वाढीस लागते.

घ्यायची दक्षता :-

घशाचा त्रास वेदना  सूज असल्यास ही मुद्रा करू नये..



_____;_____;_____;_______________________

No comments:

Post a Comment

leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.

Spoken English Training March 2018

We have completed training which is Spoken English training in Kalabani, Khed Ratnagiri.Our trainer are Mr.Prabhakar Kolekar &   In th...