सूर्यनमस्कार
ही भारतीय प्राचीन व्यायाम पद्धती आहे.भगवान सुर्यनारायनाला अष्टांगांनी केलेला नमस्कार होय.प्रातःकाळी पूर्व दिशेला तोंड करून ,सुर्यनारायणाची स्तुती करत सूर्यनमस्कार घालण्याची परंपरा आहे.
संपूर्ण विश्वाला ऊर्जा व प्रकाश देणाऱ्या,ऋतूंची निर्मिती करणाऱ्या आणि अन्न निर्माण करणाऱ्या सूर्याला नमस्कार केल्याने सकाळच्या कोवळ्या किरणांचा शरीराला लाभ होतो .सूर्यनमस्कारामुळे शारीरिक व्यायाम होतो त्याचप्रमाणे विचाराना उत्तेजन मिळते. उगवत्या सूर्याच्या समोर हा व्यायाम केल्याने ,सूर्याच्या किरणाद्वारा जीवनसत्व डी भरपूर प्रमाणात शरीरास मिळते.
सूर्यनमस्कारामध्ये एकूण बारा अवस्था आहेत.या प्रत्येक अवस्थाने शरीराच्या प्रत्येक अवयवास व्यायाम मिळतो.या बारा अवस्थांचा मिळून एक सूर्यनमस्कार होते आणि पंचवीस नमस्काराचे एक आवर्तन होते.
प्रत्येक अवस्थांची चित्रासह माहिती पुढे दिली आहे.प्रत्येक अवस्थेपासून मिळणाऱ्या फायद्याची माहितीही दिली आहे.सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी प्रथम प्रार्थना म्हणावी आणि प्रत्येक नमस्काराबरोबर सूर्याचे एकेक नाव उच्चारून नमस्कार घालावा.
१) ओम मित्राय नमः
२) ओम रवये नमः
३)ओम सूर्याये नमः
४)ओम भानवे नमः ।
५)ओम खगाय नमः।
६)ओम पुष्णे नमः।
७)ओम हिरण्यगर्भय नमः।
८)ओम मरीचये नमः।
९) ओम आदित्याय नमः
१०) ओम सवित्रे नमः। For video CLICK HERE
११)ओम अर्काय नमः ।
१२) ओम भास्कराय नमः।
१) दक्षासन:-
कृती:-
पहिल्या आसनस्थितीत डोके ,मान आणि शरीर ताठ ठेवा.
छाती विरासारखी ताठ ठेऊन दृष्टी नासिकाग्रासावर ठेवा.दक्ष अवस्थेत म्हणजे सावधान स्थितीत उभे राहा.
फायदे:--
१) या असनाने कंबरेचे रोग बरे होतात,पाठ मजबूत होतात.
२)दृष्टी नासिकाग्रसवर ठेवल्याने मनाचा चंचलपणा दूर होतो .
३) चेहरा सतेज बनतो.
४) एकाग्र होऊन ध्यानधारणा केल्याने आत्मविश्वास वाढतो.
२) नमस्कारासन:-
कृती :-
या दुसऱ्या अवस्थेत दोन्ही हात असे जोडा की ,अंगठे छातीला स्पर्श करतील .छाती काढून पोट आतील बाजूस खेचा. श्वास घेऊन फुफ्फुसे फुलवा .नजर समोर ठेवा.तोंड बंद करून कुंभक करा.
फायदे:-
१)या आसनामुळे घशाच्या तक्रारी दूर होतात.
२) आवाज सुरेल बनतो.
३) शरीर व मन सुदृढ बनते.
३) पर्वतासन:-
या तिसऱ्या अवस्थतेत हात उंच करून शरीर मागिल बाजूस खेचा.नजर आकाशाच्या दिशेला लावा . श्वास घ्या आणि सोडा .
फायदे:-
१) खांदे सुदृढ बनतात.
२) डोळे कार्यक्षम बनतात.
३) अन्ननलिकेला पुरेसा व्यायाम मिळतो.
४) हस्तपादासन:
या अवस्थेत कुंभक चालू ठेवा.गुडघे न वॉकवता करी वाका. चित्रात दाखवलेल्या प्रमाणे कृती करा.नाकाने किंवा कपाळाने गुडघ्याला स्पर्श करा आणि नाकानेच रेचक करा( श्वास बाहेर काढा).सुरुवातीला काही दिवस हात जमिनीला टेकणार नाहीत पण सरावाने हात जमिनीला टेकतील.
फायदे:-
१) पोटाच्या तक्रारी दूर होतात.छाती व हात सुदृढ व मजबूत बनतात.
२)शरीर बांधेसूद आणि सुंदर बनते
३) पश्चिमोतानासनामुळे होणारे फायदे या आसनामुळे मिळतात.
५) एकपादप्रसरणासन:--
प्रथम नाकाने ध्वनियुक्त पूरक करा.गुडघा आणि पायाची बोटे जमिनीला लागतील ,अशा प्रकारे पायमागे न्या.
चित्रात दाखवलेल्या प्रमाणे कृती करा.कंबरेला बाक द्या आणि श्वास रोखून धरा.
फायदे:-
१) हृदयाचे रोग आणि बद्धकोष्ठता दूर होतात.
२) खांदे ,गुडघे ,मान, पंजे आणि पोट यांचा चांगल्या पद्धतीने व्यायाम होतो.
३) घशाची व्याधी नाहींशी होते.
६) भूधरासन:-
कृती:-
या अवस्थतेत कुंभक चालू ठेवा आणि मुडपलेला पाय मागे न्या। शरीराचा सम्पूर्ण भार हाताच्या पंज्यावर आणि पायांच्या बोटावर ठेवा.
(चित्रात दाखवलेल्या प्रमाणे)
फायदे: -
१)हातापायातील दुखणे,गुडघ्यातील दुखणे नाहीशी होतात.
२)कंबरेवरील मेद कमी होऊन कम्बर सुरेख बनते.
३) पोटाच्या तक्रारी दूर होतात.
४) हातापायाची बोटे व फुफ्फुसे मजबूत होतात.
७)अष्टांगप्रणिपातासन:-
या अवस्थेत श्वास रोखून दोन्ही गुडघे जमिनीला टेकवा.
पोट आत खेचा मात्र जमिनीला टेकवू नका. फक्त कपाळ जमिनीला टेकवा आणि पूर्ण रेचक करा.
नमस्कारातील ही सर्वोत्तम व महत्वाची स्थिती आहे. शरीराची आठही अंगे जमिनीला टेकतात;म्हणून या स्थितीला अष्टांगप्रणिपातासन म्हणतात
फायदे:--
१) हाताची ताकद वाढते.
२ ) शरीर हलके व प्रफुल्लित बनते.
३)शरीरातील अवयव मजबूत बनतात.
४)पोटावरील चरबी कमी होते.
८) भुजंगासन:-/
कृती।
या आठव्या अवस्थेत अष्टांगप्रणिपातासन प्रमाणे पाय,गुडघे व हातांचे पंजे ठेवा, परंतु दोन्ही हात चित्रात दाखवल्याप्रमाणे सरळ ठेवा श्वास आत खेचा
छाती पुढे काढून फुलवा कंबरेला मागे बाक देऊन डोके शक्य होईल तितके वर करून मागे पहा या स्थितीत कुंभक करा.
फायदे:
१) या आसनाच्या सरावाने चेहऱ्यावरचा निस्तेजपणा दूर होतो,डोळे तेजस्वी बनतात.
अधिक फायदे पाहण्यासाठी
९) भूधरासन:-
कृती:-या अवस्थेत कुंभक चालू ठेवा.हात व पाय न हलवता ,गुडघे न वाकवता शरीर मागे न्या..डोके खाली वाकवून हनुवटी छातीला चिकटवा आणि पोट आत खेचा.
फायदे:-
१) या आसनस्थितीमुळे संधिवात लकव्यासारखे आजार होत नाही.
२)पायांना चांगला ताण बसत असल्याने ,पायातील अनेक तक्रारी दूर होतात.
३) वाढलेले पोट कमी होण्यास मदत होत
१०) एकपादप्रसरणासन:-
कृती:-
या स्थितीत हात लंबरेषेत ठेवा.डावा गुडघा मुडपून पुढे घ्या.य स्थितीत पोटावर दाब आला पाहिजे. डोके व मान मागे न्या आणि शक्य होईल तितके मागे बघा.
फायदे:-
१)पाटीतील कणा मजबूत होतो.
२) पायांना चांगला ताण बसल्याने रक्ताभिसरण जलद होते,त्यामुळे पायातील ताकद वाढते.
११) हस्तपादासन:-
ही स्थिती चौथ्या स्थितीप्रमाणे आहे.पोट आत खेचून नाक किंवा कपाळ गुडघ्यास चिकटवा.(चित्र पहा)
फायदे:
१) पोटाच्या तक्रारी दूर होतात.छाती व हात सुदृढ व मजबूत बनतात.
२)शरीर बांधेसूद आणि सुंदर बनते
३) पश्चिमोतानासनामुळे होणारे फायदे या आसनामुळे मिळतात.
१२) नमस्कारासन :-
कृती
शेवटच्या बाराव्या स्थितीत ध्वनियुक्त पूरक करून दुसऱ्या अवस्थेप्रमाणे ताठ उभे रहा.
फायदे :/
१)या आसनामुळे घशाच्या तक्रारी दूर होतात.
२) आवाज सुरेल बनतो.
३) शरीर व मन सुदृढ बनते.
घ्यायची नोंद:----
सकाळी कोवळ्या व स्वछ सूर्यप्रकाशात सूर्यनमस्कार घालावेत.
दम लागणार नाही असे किंवा घाईगडबडीत सूर्यनमस्कार घालू नयेत
_________;___________________________
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.